सप्टेंबर च्या शेवटच्या आठवडयात पावसाने अख्ख्या मौसामाची कसर खूप प्रमाणात भरून काढली तरी यंदा पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती. पाव्साकॅं सांगावा घेऊन येणारे ढग मात्र नेमाने आकाशात हजेरी लावायचे आणि हे मेघ नुसतीच हूल देऊन निघून जायचे. पण या ढगाळ वातावरणा मुले मुंबई च्या क्षितिजावर काही छान व्हिस्युअल्स दिसली टी या ढगांमुळेच. धागैन्म्धून बाहेर पडणारी सूर्यकिरण आणि त्यामधून मिळणारी स्कायलाईन दिलखेच होती. या वेळी मुंबईकरांना क्वचितच पाहायला मिळेल अस इंद्रधनुष्याचे दर्शन हि घडले. आता तर पाउसही जमके बरसू लागल्याने नुसतीच हुलकावणी देणारे ढग यांच्या वरचा रागही ओसरला असेल. तेव्हा मेघांमुळे निर्माण झालेल्या या छान व्हिस्युअल्स चा आस्वाद घेण्यास काही हरकत नाही.
-आदेश अ. पोखरे-चौधरी.