Monday, 5 November 2012

डबेवाल्यांची धावपळ



                       मुंबई ची धावपळ हि नेहमीचीच, मात्र या सर्व धावपळीत आपण ऑफिस मध्ये असताना दुपारच्या वेळी घरचा डबा आपल्या पर्यंत वेळेत आणण्यासाठी धावपळ करणारा मुंबईचा डबेवाला म्हणजे धावत्या मुंबई चे प्रतीकच. हा व्यवसाय मुंबईतल्या डबेवाल्यांनी सुमारे १२० वर्षांपासून नित्यनेमाने आणि यशस्वी आपल्या खांद्यांवर पेलला आहे. याच दाबेवालान्चा रोजच्या धाब्गाद्यातील मूड्स टिपण्याचा माझा एक धावता पाळता प्रयत्न.
                       डबेवाल्यांचा कामाला सुरुवात होते ती सकाळी नऊ वाजता. प्रत्येक डबेवाला आपल्या ठरलेल्या ठिकाणा नुसार गिरहयाकाच्या घरी दाब गोळा करण्यास सुरुवात करतो. सर्व डबे जमा करून झाले कि जवळ च्या रेल्वे स्थानकात येतो आणि डबे पोहचवण्या साठी सी.एस.टी. कडे जाणारी लोकल पकडतो.
                       त्यांची हि धावपळ रोज पाहणारे मुंबईकरांना अप्रूप वाटत नसली तरी मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांना या डबेवाल्यांच्या कामाचे आशचर्य वाटत असते. ते या डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक करताना दिसतात.
                       आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात, पण डबेवाले इतरांच्या पोटाची भूक भागवून स्वतःचे पोट भारत असतात.
                                                                             - आदेश अ. पोखरे-चौधरी.

Saturday, 13 October 2012

नभ मेघांनी आक्रमिले

                             सप्टेंबर च्या शेवटच्या आठवडयात पावसाने अख्ख्या मौसामाची कसर खूप प्रमाणात भरून काढली तरी यंदा पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती. पाव्साकॅं सांगावा घेऊन येणारे ढग मात्र नेमाने आकाशात हजेरी लावायचे आणि हे मेघ नुसतीच हूल देऊन निघून जायचे. पण या ढगाळ वातावरणा मुले मुंबई च्या क्षितिजावर काही छान व्हिस्युअल्स  दिसली टी या ढगांमुळेच. धागैन्म्धून बाहेर पडणारी सूर्यकिरण  आणि त्यामधून मिळणारी स्कायलाईन दिलखेच होती. या वेळी मुंबईकरांना क्वचितच पाहायला मिळेल अस इंद्रधनुष्याचे दर्शन हि घडले. आता तर पाउसही जमके बरसू लागल्याने नुसतीच हुलकावणी देणारे ढग यांच्या वरचा रागही ओसरला असेल. तेव्हा मेघांमुळे निर्माण झालेल्या या छान व्हिस्युअल्स चा आस्वाद घेण्यास काही हरकत नाही. 
                                                       -आदेश अ. पोखरे-चौधरी.